निबंध

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya ugavala nahi tar marathi nibandh

Published by
marathicircle

surya ugavala nahi tar marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीत या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी मला पडलेले स्वप्नया निबंधासंबंधीत काही मुद्दे या निबंधामधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सूर्य उगवला नाही तर काय होऊ शकते याबद्दल माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

If you looking for surya ugavala nahi tar marathi nibandh then this is the right place for you. Also Readमला पडलेले स्वप्न मराठी निबंध

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी

 

शाळेतून घरी येत असताना उन्हामुळे अवस्था खूप खराब झाली होती. पूर्ण अंग घामाने ओले झाले होते. मला उन्ह असह्य झाले होते.

मी एका झाडाच्या सावलीत थोडावेळ विसावा घेतला. तेवढ्यात माझ्या मनात एक कल्पना आली की सूर्य उगवला नाही तर….

मी मनातल्या मनात विचार करू लागलो. सूर्य उगवला नाही तर किती मज्जा येईल ना.

सूर्य उगवला नाही तर सकाळच होणारच नाही. शाळेला रोज सुट्टी असेन त्यामुळे मला या कडक उन्हात शाळेत जावे लागणार नाही. शाळेत जाण्याचा मोठा प्रश्न सुटेल.

शाळांना सुट्टी असल्यामुळे अभ्यासपासून मला अराम मिळेल.

सूर्य उगवला नाही तर आईची सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गडबड होणार नाही. बाबांना कामावर जावे लागणार नाही. सूर्य न उगवल्यामुळे घरातील सर्वांना मनसोक्त आराम करता येईल.

उन्हाळ्याच्या दिवसात तर उन्हामुळे घराबाहेर पडणेही अवघड होते. सूर्य उगवला नाही तर कडक उन्ह नसेन त्यामुळे वातावरण खूप छान होईल.

सूर्य उगवला नाही तर आणखी काय काय होऊ शकते याचा मी विचार करत असताना माझ्या मनात विचार येऊ लागला की सूर्य उगवला नाही तर फक्त फायदाच होऊ शकतो का? व मी विचार करू लागलो.

सूर्य हा आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे. सूर्य हा वनस्पती प्राणी यांच्या जीवनाचा आधार आहे.”surya ugavala nahi tar marathi nibandh”

सूर्य आपल्या किरणांनी संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करतो व आपल्या जीवनातही आनंद घेऊन येतो.

सुर्यामुळे आपल्याला प्रकाश, उष्णता मिळते. हा सूर्य जर उगवला नाही तर पृथ्वीवर सर्वत्र अंधार पसरेल.

सूर्यापासून आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. सूर्यकिरणांपासून मिळणारे काही घटक हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. सुर्यामुळे आपण निरोगी राहतो.

surya ugavala nahi tar marathi nibandh

आपल्याला निरोगी राहण्यासाठी शुद्ध हवा जेवढी गरजेची आहे तेवढाच सूर्य प्रकाशही गरजेचा आहे.

मानवी शरीरासाठी आवश्यक असलेले विटामिन डी आपल्याला सुर्यामुळे मिळते. विटामिन डी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असते त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

        सूर्य उगवला नाही तर

सूर्य उगवला नाही तर सूर्योदयाचे रमणीय दृश्य आपल्या नजरेस पडणार नाही. सूर्योदयाचा आनंद आपण घेऊ शकणार नाही.

जर सूर्य उगवला नाही तर पक्ष्यांचे छान छान आवाज कानावर पडू शकले नसते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या सुंदर निसर्गाची अवस्था खूप खराब होऊन जाईल. सर्व झाडे झुडपे सुकून जातील.

सूर्य दर्शन घेतल्यामुळे आपला दिवस अगदी प्रसन्न होऊन जातो. आपल्याला सुर्यामुळे ऊर्जा मिळते व आपण ही ऊर्जा आपल्या कामात वापरतो.

सूर्य न उगवल्याने आपण खूप आळशी होऊ त्यामुळे आपले आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होईल.”surya ugavala nahi tar marathi nibandh”

सर्वत्र अंधार असल्यामुळे मुलांना शाळेत जाता येणार नाही त्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

सूर्य जर उगवला नाही तर पाऊस पडणार नाही आणि पाऊस पडला नाही तर पाण्याअभावी कोणतेही झाड उगवू शकणार नाही.

शेतकऱ्यांसाठी तर हे मोठे आव्हानच ठरेल. पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही तर पिके सुकून जातील. पिकांना जेवढी गरज पाण्याची आहे तेवढीच गरज सूर्प्रकाशाची आहे.

जर शेतकरी शेतीतून पिके घेऊ शकला नाहीतर आपल्याला अन्न मिळणेसुद्दा कठीण होऊन जाईल.

शेती, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात ठप्प होऊन जातील. सूर्य उगवला नाही तर विजेचा वापर वाढल्यामुळे तीही थोड्या दिवसात संपेल व सर्वत्र अंधारच होऊन जाईल.

सूर्य उगवला नाही तर सूर्य किरण पृथ्वीवर पडू  शकले नसते मग प्रकाश येणार कुठून.

आपल्या आजूबाजूला असलेली झाडे झुडपे जिवंत राहू शकणार नाहीत.

Surya ugavala nahi tar marathi nibandh

 

प्रत्येकालाच सूर्यप्रकाशाची ओढ असते.

अनेक पक्षी आपला विसावा झाडांवर करतात. जर सूर्य उगवला नाही तर झाडे सुकून जातील.

पक्ष्यांना प्राण्यांनासुद्धा अन्न मिळणे कठीण होईल त्यामुळे पशुपक्ष्यांच्या जिवालाही धोका निर्माण होईल.

अन्न, पाणी हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. आपल्या सर्वांसाठी पाणी हेच जीवन आहे.

उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे आपल्याला थंड वातावरण हवे असते.सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीत

थोडे दिवस आपल्याला हे वातावरण आवडेल परंतु हळू हळू वातावरणात थंडीचे प्रमाण वाढत जाईल.

जर सूर्य उगवला नाही तर आपल्याला पाणी मिळणेसुद्दा कठीण होईल. सूर्याच्या प्रकाशामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते व पाऊस पाडण्यास सुरुवात होते.

सूर्य उगवला नाही तर पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही त्यामुळे पाऊस पडणार नाही. म्हणजेच आपल्या समोर अन्नाचा समस्येसोबत पाण्याची समस्यासुद्धा उभी राहिली असती.

आपल्याला सूर्यकिरणे ऊब तर देतातच व सोबतच आरोग्य नीट राहण्यासाठी मोठा हातभारही लावतात.

सूर्य उगवला नाही तर निसर्गाचा समतोल बिघडेल. आपण सर्व सूर्य दर्शनासाठी आतुर होईल.

सूर्य उगवला नाही तर खूप आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागेल. सूर्य किरणांमुळे अनेक रोगांचे किटाणू नष्ट होतात त्यामुळे आपले आरोग्य नीट राहण्यास मदत होते.

Surya ugavala nahi tar

सूर्य उगवला नाही तर भरपूर अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागेल. भरपूर कामे लांबणीवर पडतील. सुर्यामुळे आपली भरपूर विज बचत होत असते.

सूर्य उगवला नाही तर दिवसच होणार नाही त्यामुळे बाजार , उद्योग बंद राहतील.

आपल्याला सूर्य उगवलाच नाही तर सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहता येणार नाही.सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीत

आपल्यासाठी सूर्य अतिशय महत्वाचा आहे. सूर्य उगवला नाही तर हे निसर्गचक्र पूर्णपणे विस्कळीत होऊन जाईल व त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

निसर्गाचा समतोल बिघडेल. निसर्गाचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळणार नाही.

सुर्याविना पृथ्वीवरील सर्वांचे जीवन कठीण आहे. खरच सूर्य उगवला नाही तर किती खराब आणि भयानक परिस्थिती ओढावेल.

सूर्योदय रोज झालाच पाहिजे कारण सूर्य आहे तर सजीवसृष्टी आहे. सूर्याच्या उर्जेविना सजीव जीवन अशक्य आहे.

असे अनेक विचार मनात येताच मी स्वतःलाच म्हंटल…सूर्य हा उगवलाच पाहिजे.

सूर्य उगवला नाही तर ही फक्त कल्पनाच राहू देऊ.

तर मित्रांनो तुम्हाला “surya ugavala nahi tar marathi nibandh” ( सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीत ) हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल –pravinysankpal@gmail.com

वरील सूर्य उगवला नाही तर या निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

View Comments